कोविड क्वारंटाइनमधील सवलतींमुळे चीनमध्ये अचानक वाढली कच्च्या तेलाची मागणी

कोविडमुळे चीनला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या झीरो कोविड पॉलिसीमुळे मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायाची घडी विस्कटली आहे. यामुळे चीनमध्ये क्रूड ऑईलची मागणी घटली होती. मात्र, आता चीनने कोविड १९च्या काही कडक नियमांमध्ये सवलत दिली आहे. परिणामी आर्थिक घडामोडींना वेग आला. त्यामुळे चीनमध्ये कच्च्या तेलाच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यातून दरवाढ झाली. कच्च्या तेलाच्या किमतीत सोमवारी जवळपास १ टक्क्याची वाढ दिसून आली.

आज तकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शुक्रवारी १.१ टक्के घसरणीनंतर सोमवारी ब्रेंट क्रूड फ्युचर LCOc१ ८७ सेंट अथवा ०.९ टक्के वाढून ९६.८६ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचले. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड फ्युचर्स CLc१ ८९.७६ डॉलर प्रती बॅरल झाले. यामध्ये ८० सेंट अथवा ०.९ टक्क्यांची वाढ झाली. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने आपल्या कोविड प्रोटोकॉलमध्ये बदल केला आहे असे रॉयटर्सने म्हटले आहे. मात्र, वीकेंडमध्ये चीनमध्ये कोविडच्या रुग्णांत वाढ दिसून आली. एपीआय असेट मॅनेजमेंटचे स्टीफन इनेस यांनी एका लेखात म्हटले आहे की, कोविड निर्बंधामुळे निर्माण झालेल्या नकारात्मकतेवर या सवलतींचा परिणाम होईल. लॉकडाउनमुळे कमी झालेली मागणी तत्काळ वाढणार नाही. मात्र, त्यात सुधारणा होईल. एका रिपोर्टनुसार गेल्या आठवड्यात किमती घसरण होवून क्लोज झाल्या होत्या. मात्र, शुक्रवारी चीनने पहिल्यांदाच कडक कोविड पॉलिसीमधून सवलत दिली जात असल्याचे सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here