साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी ऊस दर जाहीर करण्याची मागणी

66

अमरोहा : अमरोहा येथील ऊस विकास सहकारी समितीच्या आयोजानंतर झालेल्या ऊस संरक्षण बैठकीत भारतीय किसान युनियनच्या भानू गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ऊस उत्पादकांच्या समस्या मांडल्या. या बैठकीत कारखान्यांनी उसाचा दर हंगाम सुरू होण्यापूर्वी जाहीर करावा आणि हा दर साडेचारशे रुपये प्रती क्विंटल असावा अशा मागण्या करण्यात आल्या.

या बैठकीत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी दिवाकर सिंह यांनी यावेळी साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी उसाचा दर जाहीर केला गेला पाहिजे अशी मागणी केली. कारखान्यांनी उसाला प्रती क्विंटल ४५० रुपये दर द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नवी ऊस खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांचा ऊस लवकरात लवकर गाळपासाठी घेण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. सर्व साखर कारखाने ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू केले जावेत यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे ठरले. यावेळी चौधरी धर्मवीर सिंह, पप्पू सिंह, अमित कुमार, समरपाल सैनी, सुरेंद्र सिंह, गजेंद्र सिंह, राहुल सिंह आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here