ऊस दर ४०० रुपये क्विंटल जाहीर करण्याची मागणी

लक्सर : भारतीय किसान युनियनच्या टिकैत गटाने त्रिसूत्री मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. विज भारनियमन संपविण्यासह विविध तीन मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावे हे निवेदन देण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

भाकियूच्या टिकैत गटाच्या कार्यकर्त्यांनी चौधरी किरत सिंह यांच्या नेतृत्वाखाली लक्सर तहसीलमध्ये जाऊन उप जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खते, किटकनाशके, डिझेल, कृषी उपकरणे यांच्या दरात सातत्याने वाढ होऊ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील मजुरीही भागविणे अशक्य झाले आहे. ऊसाचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी दर ४०० रुपये क्विंटल जाहीर करण्याची गरज आहे. ऊस विभागाने सुरू केलेले नवे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. वीज विभागाकडून दररोज अनेक तास विज खंडीत केली जात आहे. त्यामुळे व्यावासायिकांसह शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हे थांबविण्यासाठी अखंड वीज द्यावी.

यावेळी भंवर सिंह, साधुराम, बिजेंद्र सिंह, रोहताश, मोनू, सोमपाल सिंह, बंगाल सिंह, विनोद कुमार, संजय कुमार, विजय कुमार, ओमपाल सिंह, मनोज कुमार, रजनीश, सोमेंद्र कुमार, विकास कुमार आणि अस्लम आदी उपस्थित होते. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानंतर भाकियूच्या टिकैत गटाच्या कार्यकर्त्यांनी लखीमपूर खिरीतील मृत शेतकऱ्यांना आदरांजली वाहिली. जर १७ ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय राज्यमंत्र्यांना अटक केले नाही तर १८ ऑक्टोबर रोजी रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here