बिजनौर : भाकियू लोकशक्ती अराजकीयच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील परिसरात बैठक घेऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले. कार्यकर्त्यांनी धामपूर साखर कारखान्याच्या विरोधातील आंदोलनाचे समर्थन करताना नूरपूरमध्ये साखर कारखाना सुरू करण्याची मागणी केली. चांगीपूरमध्ये स्थापन होणाऱ्या कारखान्यास अडथळा आणला जात आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. जर धामपूर साखर कारखान्याने आपली अडवणूकीची भूमिका सोडून जर कारखाना उभारणीस शेतकऱ्यांना पाठबळ दिले नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, विभाग अध्यक्ष अरुण कुमर यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. शेतकऱ्यांनी त्यानंतर त्रिस्तरीय मागण्यांचे निवेदन तहसीलदार गोपेश तिवारी यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, धामपूर साखर कारखाना विकास आणि शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. आपले हित साधण्यासाठी त्यांनी चांगपूर कारखान्याच्या उभारणीत अडथळे आणले आहेत. आधीच धामपूर कारखाना शेतकऱ्यांचे शोषण करीत आहे. ऊस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट केली जाते. जर आता अडथळा आणला गेला तर तीव्र आंदोलन केले जाईल.