ब्राझीलमध्ये यंदा इथेनॉलची मागणी वाढण्याची शक्यता

 साओ पावलो (ब्राझील) : चीनी मंडी

कच्च्या तेलाच्या किमती जागतिक पातळीवर घसरल्यामुळे इथेनॉलच्या मागणीत घसरण होण्याची शक्यता व्यक्त होत असताना, ब्राझीलमध्ये यावर्षी इथेनॉलच्या मागणीत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जर, ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेत अपेक्षित वाढ निश्चित झाली तर, इथेनॉलची मागणीही वाढेल, असा अंदाज सेंटर फॉर अडव्हान्सड स्टडिज् ऑल अप्लाइड इकॉनॉमिक्स (सीईपीईए) या संस्थेने व्यक्त केला आहे.

ब्राझीलच्या सेंट्रल बँकेने २०१९ मध्ये देशाचा जीडीपी २.५५ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे देशात कारची विक्री मोठ्या प्रमाणात वाढेल आणि परिणामी इंधनाची मागणी वाढेल, असा अंदाज आहे. २०१९-२० या हंगामातील गाळपाचे प्रमाण आणि टोटल रिकव्हरेबल शुगर (एटीआर) हे २०१८-१९च्या आकड्यांप्रमाणेच असण्याची शक्यता आहे. पण, त्यातही साखरेचे उत्पादन तुलनेत वाढणार आहे.

‘सीईपीईओ’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साखरेच्या किमती वाढू लागल्याने साखर कारखान्यांनी उत्पादन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. साखरेचा कमी झालेला साठा आणि जागतिक पातळीवर असलेला तुटवडा याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जाते आहे. त्यामुळे साखरेसाठी उसाचे गाळप वाढून इथेनॉल कमी होण्याचा अंदाज आहे.

यंदाच्या हंगामात जरी साखरेचे उत्पादन वाढणार असल्याचे दिसत असले तरी, २०१९-२०च्या हंगामात इथेनॉल उत्पादनावरच लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. जवळपास ६० टक्के कच्चा माल हा इथेनॉल उत्पादनासाठी उपयोगात येणार असल्याचे ‘सीईपीईओ’ या संस्थेचे म्हणणे आहे.

देशातील इथेनॉलची गरज भागवण्यासाठी कॉर्नपासून बनवण्यात येणाऱ्या इथेनॉलचाही हातभार लागू शकतो. ‘सीईपीईओ’च्या म्हणण्यानुसार कारखाने गॅसमध्ये मिसळता येणारे (२७.५ टक्के प्रमाणात) अॅनहायड्रोउस (वायू स्वरूपातील) इथेनॉल तयार करण्यावर भर देण्याची शक्यता आहे.

या सगळ्याचा परिणाम म्हणून जर, २०१९-२०च्या हंगामातील द्रवरुपातील इथेनॉलचे उत्पादन, विक्री आणि साखर किंवा इथेनॉल या विषयीचे अंदाज निश्चित दिसू लागले तर, ब्राझीलमध्ये इथेनॉलची किंमत वाढेल. इथेनॉलची किंमत वाढल्याने गॅसऑईलशी असलेली त्याची किंमत स्पर्धा कमी होईल.

ब्राझीलमधील इथेनॉल मार्केटमध्ये यंदाच्या २०१९च्या हंगामात ‘रेनेवाबायो’ या इथेनॉल व्यवसायातील गुंतवणूक वाढवणाऱ्या कार्यक्रमावरही लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

इथेनॉलच्या क्षेत्रात अनिश्चितता असूनही या वर्षाच्या मध्यपर्यंत इथेनॉल उत्पादन वाढीसाठीच्या योजना राबविण्यास सुरुवात होणार होईल, असे ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोलसोनॅरो यांच्या नव्या सरकारचे धोरणर आहे.

‘सीईपीईओ’ या संस्थेच्या म्हणण्यानुसार, ‘रेनेवाबायो’ या योजनेमध्ये कोणत्याही प्रकराच्या अनुदानाचा आणि कर सवलतीचा समावेश नसल्यामुळे नवे सरकार त्याला पाठिंबा देईल. त्याचबरोबर ब्राझीलच्या जीडीपमध्ये होणाऱ्या वाढीचा परिणाम साखरेची मागणी वाढण्यावरही होणार आहे. त्यामुळे २०१९मध्ये ब्राझीलमधून साखर निर्यातीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या वर्षी ब्राझील साखरेची निर्यात ८ ते ९ टक्क्यांनी कमी करण्याची शक्यता आहे, असे ‘सीईपीईओ’ने म्हटले आहे.

 

डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here