नजिबाबाद साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाची मागणी

बिजनौर : भारतीय किसान श्रमिक जनशक्ती युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी नजिबाबाद साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाची मागणी केली. यासह विविध मागण्यांचे राष्ट्रपतींच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
उत्तर प्रदेशचा गळीत हंगाम या महिन्याच्या सुरुवातीला संपला. गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी साखर उत्पादन झाले असले तरी शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊसाच्या उत्पादनाकडे वळत असल्याचे दिसून आले आहे. यावर्षी राज्य सरकारने ऊसाचे किमान समर्थन मूल्य वाढवले नसले तरी चांगल्या हवामान, पावसामुळे पुढील वर्षी हंगाम साधला जाईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेचे विस्तारीकरण करण्याचे धोरण स्वीकारले आहे. याशिवाय, इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे. इथेनॉल उत्पादनासाठी गुंतवणूकदारांना आकृष्ट करणारे धोरण मांडले असल्याने सुमारे १२५० कोटी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात झाली आहे. केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे धोरण जाहीर केले. त्याची मुदत पाच वर्षांनी कमी करून २०२५ करण्यात आली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. उत्तर प्रदेशातील वाढत्या ऊस उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांचे विस्तारीकरण ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे नजिबाबाद साखर कारखान्याचे विस्तारीकरण झाल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना भारतीय किसान श्रमिक जनशक्ती युनियनने दिलेल्या निवेदनात इतर मागण्यांचा समावेश आहे. यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिले त्वरीत दिली जावीत, नजिबाबाद कारखान्याचे विस्तारीकरण करून गाळप क्षमता वाढवावी, साखर कारखान्याच्या कामगारांचे आणि शेतकरी, कामगारांचे शोषण थांबवावे आदींसह विविध नऊ मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देताना दिनेश कुमार, राजकुमार, सरदार हॅप्पी सिंह, रणधावा सिंह आदींसह शेतकरी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here