सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याची मागणी

बिजनौर : नजीबाबाद येथे भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी तहसील परिसरात मासिक बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी सहकारी साखर कारखान्याची क्षमता वाढवणे, शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिले देणे, मोकाट जनावरांपासून पिकांचे संरक्षण करणे, शेतकऱ्यांशी संबंधीत खराब रस्त्यांची दुरुस्ती करणे आदी मागण्या उपस्थित करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल आंदोलन करण्याबाबत कार्यकर्त्यांनी चर्चा केली. भाकियूचे चौधरी बलराम सिंह हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, विभागीय अध्यक्ष कुलवीर सिंह यांनी सांगितले की, शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. शेतकरी गेल्या अनेक काळापासून ऊस दराची थकबाकी आणि किसान सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक क्षमता वाढीची मागणी करीत आहेत. मात्र, त्याकडे सरकार, कारखाना प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी विजय वर्धन तोमर यांना निवेदन सादर केले. यामध्ये वीज बिलांप्रश्नी शेतकऱ्यांना त्रास देणे बंद केले जावे, शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य दर मिळावे, नुरपूर साखर कारखान्याची उभारणी आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले. भोपाल राठी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीस विनोद परमार, सुनील कुमार, विजय सिंह, रोबिन कुमार, ऊदल सिंह, हिमांशू, सत्यपाल सिंह व राजीव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here