महाराष्ट्र, कर्नाटकप्रमाणे तेलंगणामध्येही इथेनॉल उत्पादन वाढविण्याची मागणी

हैदराबाद : देशातील अनेक राज्यांमध्ये आता इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राजे सर्वात अग्रेसर आहेत. तेलंगणामध्येही इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची मागणी केली जात आहे.

द हिंदू डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, भाजपचे ज्येष्ठ नेते गुडूर नारायण रेड्डी यांनी तेलंगणा सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारप्रमाणे इथेनॉल धोरण जाहीर करण्याची मागणी केली आहे. इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये इथेनॉल युनिट स्थापन केली जात आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यासाठी तेलंगणामध्ये इतर राज्यातून इथेनॉल मागविले जात असल्याचा दावा रेड्डी यांनी केली. तेलंगणामध्ये इथेनॉल उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला. तेंलगणा शुगर मिल्स असोसिएशनने दोन वर्षांपूर्वी सरकारकडे अशा प्रकारच्या धोरणाबाबत मागणी केली होती. मात्र, सरकारने काहीच प्रयत्न केले नाहीत. ९.८९ टक्के इथेनॉल मिश्रणासह उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. तर कर्नाटकात ९.६८ टक्के, महाराष्ट्रात ९.५९ टक्के, बिहारमध्ये ९.४७ टक्के, मध्य प्रदेशात ८.८७ टक्के आणि आंध्र प्रदेशात ८.७३ टक्के इथेनॉल मिश्रण केले जात आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here