ऊस FRP मध्ये वाढीनंतर साखरेची MSP, इथेनॉल खरेदी दरात वाढीची मागणी

नवी दिल्ली : खासगी कारखानदारांनी साखरेचा किमान विक्री दर (MSP) आणि इथेनॉलच्या खरेदी दरात योग्य वाढीची मागणी केली आहे. पुढील हंगामासाठी ऊसाच्या योग्य आणि लाभदायी दरात (FRP) वाढ केल्यानंतर साखरेचा उत्पादन खर्च वाढू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळीय समितीने (सीसीईए) गेल्या आठवड्यात हंगाम २०२३-२४ साठी (ऑक्टोबर-सप्टेंबर) एफआरपीमध्ये सध्याच्या ३०५ रुपये प्रती क्विंटलवरुन १०.२५ टक्के मूळ रिकव्हरीसाठी ३१५ रुपये प्रती क्विंटलपर्यंत वाढीस मंजुरी दिली आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) चे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी बिजनेसलाइन ला सांगितले की, सरकारने जे केले आहे, ते शेतकऱ्यांसाठी चांगले आहे, ही बाब आम्हाला मान्य आहे. कारण या दरवाढीनंतर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना चांगल्या उसाची उपलब्धतो होवू शकेल. यासोबतच सरकारला साखरेची एमएसपी, इथेनॉल खरेदी दरात वाढ या दोन गोष्टींना एफआरपीसोबत समायोजित करण्याची गरज आहे.

ते म्हणाले की, साखरेची एमएसपी सुधारित करण्याची गरज आहे. कारण, गेल्या तीन वर्षात कोणतीही सुधारणा झालेली नाही. नव्या एफआरपीमध्ये साखर कारखान्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होईल. यासोबतच एफआरपीसोबत ताळमेळ घालण्यासाठी इथेनॉलच्या दराबाबत पुन्हा विचार केला गेला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here