ऊस थकबाकीची लवकरात लवकर भागवण्याची रालोद विद्यार्थी सभेची मागणी

149

शामली : रालोद विद्यार्थी सभेच्या कार्यकर्त्यांनी ऊसाची थकबाकी लवकरात लवकर भागवण्याच्या मागणीवरुन मुख्यमंत्र्यांच्या नावे एक निवेदन जिल्हा ऊस अधिकार्‍यांकडे सुपुर्द केले.

सोमवारी रालोद विद्यार्थी सभेचे जिल्हा महासचिव राजन जावला यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्ते डिसीओ कार्यालयात पोचले. कार्यकर्त्यांनी डीसीओ विजय बहादुर सिंह यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे एक निवेदन सुपुर्द केले. निवेदनात म्हटले आहे की, शामली येथील तीनही साखर कारखान्यांवर ऊस शेतकर्‍यांचे जवळपास एक हजार करोड रुपये देय आहेत. त्यांनी ही थकबाकी भागवण्याबाबत मागणी केली. कार्यकर्त्यांनी सांगितले की, थकबाकी न भागवल्याने शेतकरी अडचणीत आहेत. ऊसाचे पैसे भागवल्यास शेतकरी विजेचे बिल, मुलांची शाळेची फी जमा करण्यासह इतर कामे करु शकणार आहेत. याबरोबरच पुढच्या पिकासाठी किटकनाशक औषध, खत आदी खरेदी करु शकतील. यावेळी रामकुमार वर्मा, मुबारिक अली, रोहित आकाश, विकास धीमान आणि आशीष बनत आदी उपस्थित होते.कोविड – 19 महामारी मुळे लॉकडाऊन आहे ,अश्या परीस्ठीमध्ये कारखान्याची साखर विक्री न होता तशीच पडून आहे ,त्यामुळे कारखाने अडचणीत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here