उत्तर प्रदेशात ऊस दर ४५० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी

53

सरकारने ऊसाची  FRP वाढवून ३०५ रुपये प्रती क्विंटल केली आहे. उत्तर प्रदेशमध्येही शेतकरी संघटनांनी राज्य सल्लागार किंमतीमध्ये (SAP) वाढ करण्याची मागणी केली आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित करण्यात खूप सक्रीय असलेले शेतकरी नेते व्ही. एम. सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारकडे ऊसाची SAP वाढविण्याची मागणी केली आहे.

चीनीमंडीसोबत बोलताना व्ही. एम. सिंह यांनी सांगितले की, ऊसाचा उत्पादन खर्च पाहता आता ४५० रुपये प्रती क्विंटल ऊस दर जाहीर करावा अशी आम्ही राज्य सरकारकडे मागणी करीत आहोत. या मागणीबाबत १६ ऑगस्ट रोजी तालुक्यांच्या स्तरावर राष्ट्रीय शेतकरी कामगार संघटना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here