फिजी शुगर कॉर्पोरेशन च्या सीईओ यांना हटवण्याची मागणी

166

फिजीच्या राष्ट्रीय शेतकरी यूनियन चे महासचिव महेंद्र चौधऱी यानीं सांगितले की, ऊस शेतकरी फिजी शुगर कॉर्पोरेशन चे सीईओ ग्राहम क्लार्क आणि वरिष्ठ व्यवस्थापन यांना हटवण्याची मागणी करत आहेत. रारावाई कारखान्यामध्ये सलग तीन महिन्यांपासून निराशाजनक प्रदर्शनानंतर सातत्याने कारखान्यात ब्रेकडाउन होत आहे, पण क्लार्क यांचे म्हणणे आहे की, सध्याचा गाळप हंगाम गेल्या वर्षाच्या तुलनेत 17 टक्क्याने पुढे आहे.

चौधऱी यांनी सांगितले की, गेल्या आठवड्याच्या अखेरीस कारखान्यात ऊस पोचवणार्‍या शेतकर्‍यांना वाहने रिकामी करण्यास, जवळपास दोन दिवस प्रतिक्षा करावी लागली होती, ते म्हणाले की, यांत्रिक समस्यांमुळे असा विलंब अनेकदा होत आहे. चौधरी यांचा दावा आहे की, कारखाना प्रत्येक आठवड्यात 30,000 टनाच्या क्षमतेपेक्षा खाली येत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here