सितारगंज साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याची मागणी

नेनिताल, उत्तराखंड: ऊस थकबाकी भागवणे आणि सितारगंज साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याच्या मागणीबाबात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यापूर्वी काँग्रेस कार्यालयात बैठक झाली . वक्त्यांनी सांगितले की, सितारगंज येथील शेतकर्‍यांचे सरकारने ऊसाचे पैसे दिलेले नाहीत. ज्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती वाईट झाली आहे. शेतकरी कर्जात बुडाले आहेत.

तांदळाच्या पिकासाठी खत,बि-बियाण्यासाठी अधिक व्याजदराने शेतकरी कर्ज घेत आहेत. वक्त्यांनी,शेतकर्‍यांचे पैसे भागवण्याची मागणी केली. वक्त्यांनी सांगितले की, सितारगंज साखर कारखाना बंद करण्यात आला. हा कारखाना सुरु होण्यासाठी शेतकरी कित्येक काळापासून आंदोलन करत आहेत. पण सरकारने आतापर्यंत निर्णय घेतलेला नाही. वक्त्यांनी तांदूळ खरेदीचीही सर्व व्यवस्था लवकरात लवकर करणे आणि 1 ऑक्टोबरपासून सरकारी खरेदी केंद्रांमध्ये तांदुळ खरेदी निश्‍चित करण्याची मागणी केली. यावेळी नगर अध्यक्ष हरपाल सिंह, ब्लॉक अध्यक्ष करन जंग, प्रदेश सचिव नवतेज पाल सिंह, संदीप बाबा, सचिन गंगवार, जिलानी अंसारी, जगदीश महरा, वसीम मियां, करमजीत सिंह, बिपिन खोलिया, दलबाग सिंह, मंजर सिंह, राजेश जायसवाल, मुख्तयार अंसारी, सरताज अहमद, सुखवंत सिंह, दर्शन सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here