साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याची मागणी

रामपूर (उत्तर प्रदेश): उद्योग व्यापार प्रतिनिधी मंडळाने जिल्हा उद्योग तसेच प्रोत्साहन केंद्राचे उपायुक्त /महाव्यवस्थापक यांना पत्र लिहून जनहितासाठी साखर कारखाना सुरु करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष संदीप अग्रवाल सोनी यांनी सांगितले की, सिविल लाइन्स क्षेत्रामध्ये साखर कारखाना जवळपास 20 वर्षांपासून बंद पडला आहे. साखर कारखाना बंद झाल्यामुळे क्षेत्रातील शेतकर्‍यांना याचा कसलाही लाभ होत नाही. याशिवाय शहरातील लोक रोजगारासाठी इकडे तिकडे भटकत आहेत. जनहितामध्ये जर हा कारखाना सुरु केला तर शेतकर्‍यांना फायदा होईल. याबरोबरच जिल्ह्यातील येथील अनेक लोंकांना यामुळे रोजगार मिळू शकेल. यासाठी लवकरच साखर कारखाना सुरु केला जावा. यावेळी सलविदर विराट, राजीव शर्मा महफूज हुसैन, अरविंद गुप्ता, नजमी खान, विजय अग्रवाल, रविंद्र सतपाल टीटू, मोहन अरोरा, मंजीत सिंह, पुलकित अग्रवाल आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here