साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी

म्हैसूर / मंड्या : कर्नाटक मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाने गती घेतली आहे. शेतकरी संघटनांनी महसूल मंत्री आर. अशोक यांना घेराव घालून साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यााबाबत आणि ऊस उत्पादकांच्या समस्यांबाबत घोषणाबाजी केली. मंत्री रंगनाथ स्वामी मंदिरात पूजा करण्यासाठी श्रीरंगपट्टण येथे आले होते. ते तेथून परतत असताना शेतकरी त्यांना भेटण्याचे प्रयत्न करीत होते. मात्र, मंत्री अशोक हे आपल्या मोटारीत जावून बसले. जेव्हा त्यांच्या चालकाने वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आंदोलनकर्त्यांनी मंत्र्यांना वाहनातून खाली उतरण्यास आणि भेटण्यास भाग पाडले.
आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर बसून जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत मंत्री अशोक हे आपल्या वाहनातून खाली उतरून आमच्या समस्या ऐकत नाहीत तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नसल्याचे सांगितले. पर्याय शिल्लक न राहिल्याने मंत्री अशोक आपल्या मोटारीतून खाली उतरले. त्यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी मंत्र्यांकडे केली. लवकरात लवकर ऊसाचे गाळप करण्याचे युनिट सुरू करावे अशी मागणी करण्यात आली. मंत्री अशोक यांनी याबाबत मुख्यंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन यावेळी दिले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here