ऊसाला ४५० रुपये क्विंटल दर देण्याची मागणी

बिजनौर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना विरोध करून त्याविषयी जनजागृतीसाठी राष्ट्रीय लोकदलाने सिकेडा गावामध्ये अभियान राबवले. यावेळी ऊसाचे दर ४५० रुपये क्विंटल जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
सिकेडामध्ये झालेल्या चौकातील चर्चा उपक्रमात बोलताना राष्ट्रीय लोकदलाचे जिल्हाध्यक्ष राहुल सिंह म्हणाले, आज देशात महागाई टोकाला पोहोचली आहे. डिझेल आणि पेट्रोलचे दर एकाच पातळीवर आले आहेत. केंद्र सरकार आणि राज्यातले सत्तारुढ सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. केंद्र सरकारने कृषी विधेयकांच्या माध्यमातून तीन काळे कायदे आणले आहेत. राज्य सरकारनेतर शेतकऱ्यांना ऊस बिलांचे पैसे देण्यास मदत केलेली नाही. याशिवाय ऊसाचा दरही जाहीर केलेला नाही. हा दर ४५० रुपये क्विंटल जाहीर करण्याची गरज आहे.

यावेळी माजी खासदार मुन्शीरामपाल, रोहित कुमार, पुष्पेंद्र, प्रशांत, संजीव, राजवीर प्रधान, राजकुमार, उपेंद्र आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here