ऊसाला प्रती क्विंटल ४५० रुपये दर देण्याची मागणी

डोईवाला : सरकारने ऊसाला प्रती क्विटंल ४५० रुपये दर द्यावा अशी मागणी भारतीय किसान युनियनने (टिकैत गट) केली आहे. मागणी मान्य न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

ऊस विकास शेतकरी सेवा समितीची बैठक डोईवाला येथे झाली. यावेळी किसान युनियनचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र सिंह खालसा यांनी उसाचा दर पाच वर्षात पहिल्यांदा वाढविण्यात आला. मात्र, ही दरवाढ खूप कमी असल्याचे सांगितले. वाढती महागाई पाहता ऊस दर ४५० प्रती क्विंटल केला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. दिल्लीच्या तिन्ही सीमेवर शेतकऱ्यांचे शहीद स्मारक उभारणी केली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. डोईवाला येथेही शहीद शेतकऱ्यांचे स्मारक उभारावे असे यावेळी ठरले. यावेळी सहकारी ऊस विकास समितीचे चेअरमन मनोज नौटियाल, संचालक मंडळाचे सदस्य संजय शर्मा, उम्मीद बोरा, दलजीत सिंह, अशोक पाल, ईश्वरचंद पाल, बलवीर सिंह, ताजेंद्र सिंह, गुरुदीप सिंह, जोगिंदर सिंह, अवतार सिंह, गुरुपाल सिंह, मोहित उनियाल, कमल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here