ऊसाचा दर प्रती क्विंटल ४५० रुपये करण्याची मागणी

68

सहारनपूर : भारतीय किसान संघाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ऊस मंत्री सुरेश राणा यांना पत्र पाठवून आगामी गळीत हंगामापूर्वी उसाचा दर प्रती क्विंटल ४५० रुपये जाहीर करावा अशी मागणी केली आहे.

किसान संघाचे राज्य संयोजक श्यामवीर त्यागी यांनी याबाबत मुख्यमंत्री आणि ऊस मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, गेल्या साडेचार वर्षात राज्यात उसाचा दर वाढविण्यात आलेला नाही. याऊलट खते आणि किटकनाशकांचे दर गगनाला भिडले आहेत. महागाईमुळे सरकारने यंदा उसाचा दर प्रती क्विंटल ४५० रुपये जाहीर करण्याची गरज आहे. कारण, पिकांच्या उत्पादनाचाही खर्च निघत नसल्याने शेतकरी गेल्या काही वर्षांपासून नुकसानीला सामोरे जात आहे. शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेऊन तातडीने ऊस दरवाढ करण्याची गरज आहे.

त्यागी यांनी सांगितले की, तीन दिवसांपूर्वी किसान संघाच्या प्रतिनिधींनी लखनौमध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची भेट घेऊन विजेचे महागडे दर कमी करावेत, शेतकऱ्यांच्या आरसीवरची बंदी उठवावी आणि उसाची थकबाकी शेतकऱ्यांना मिळावी यासह अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here