ऊसाला ५०० रुपये क्विंटल दर देण्याची मागणी

बिजनौर :शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या सोडवाव्यात आणि उसाला प्रती क्विंटल ५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन उप जिल्हाधिकाऱ्यांना दिले. भारतीय किसान युनियन (भानू)चे जिल्हाध्यक्ष चौधरी रोहिताश सिंह यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आंदोलनात उतरले होते. त्यांच्या गर्दीचे रुपांतर महापंचायतमध्ये झाले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पंचायतमध्ये शेतकरी नेत्यांनी या हंगामात ऊस दर प्रती क्विंटल ५०० रुपये जाहीर करावा अशी मागणी केली. थकीत बिले तातडीने द्यावीत, जिल्ह्यात पसरलेल्या लम्पी रोगामुळे मृत जनावरांना नुकसान भरपाई द्यावी, खासगी कुपनलीकांवर मीटर न लावणे व इतर समस्यांतून सोडवणूक करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी सुखविंदर सिंह, अरविंद पंवार, नितिन चौधरी, अनिल चौधरी, रईसुद्दीन आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here