ऊस उत्पादकांना वाहतुकीसाठी अनुदानाची टिकैत यांची मागणी

शिमला : हिमाचल प्रदेश सरकारने डोंगराळ भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अशी मागणी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली. जंगली जनावरांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यासह त्यांना आपल्या शेतातील ऊस बाजारपेठेत पाठविण्यासाठी वाहतूक अनुदान देण्याची मागणी केली.

भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील नेते राकेश टिकैत यांनी सर्व संघटनांच्या किसान मोर्चाद्वारे आयोजित पहिल्या किसान महापंचायतीला मार्गदर्शन केले.

सिरमौर जिल्ह्यातील पावटासाहेबनजिक हरिपूर टोहना गावात आयोजित महापंचायतीत बोलताना टिकैत म्हणाले, ज्या पद्धतीने सरकार बंदरांवर साखर घेऊन जाणाऱ्या कारखानदारांना अनुदान देते, तशाच पद्धतीने हिमाचल प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक व्यवस्था निर्माण करायला हवी. राज्यात एकही साखर कारखाना नाही ‌ त्यामुळे उत्पादकांना उत्तराखंड राज्यात ऊस पाठवावा लागतो असे टिकैत म्हणाले.

शेतकरी नेते गुरनाम सिंह चांदुनी यांनी सांगितले की, जर एक जग एक बाजारपेठ हे तत्त्व मान्य केले तर भारतीय शेतकऱ्यांना अमेरिकेतील शेतकऱ्यांशी स्पर्धा करणे अशक्य होईल. अमेरिकन शेतकऱ्यांकडे हजारो एकर जमीन असते. त्यांना सरकार अनुदान देते. मात्र आपल्याकडे ८० टक्के शेतकऱ्यांकडे सरासरी २.५ एकर जमीन आहे. असा फरक असताना आपण तेवढी प्रगती कशी करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here