ऊस दर ४०० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी

77

रुडकी : भारतीय किसान क्लबमध्ये झालेल्या बैठकीत ऊस दर प्रती क्विंटल करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे.

साबतवाली गावातील क्लब अध्यक्ष कटार सिंह चौधरी यांनी सांगितले की, पेट्रोल, डिझेल, वीज आणि किटकनाशके यांच्या दरात दररोज वाढ होत आहे. महागाई वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या तीन वर्षांत सरकारने ऊस दरात वाढ केलेली नाही. त्यामुळे यंदा सरकारने ऊस दर ४०० रुपये प्रती क्विंटल करण्याची गरज आहे. भाजप सरकारने सत्तेवर येताना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात उत्पन्न वाढण्याऐवजी घटत असल्याचे दिसून येत आहे. शेतीसाठी येणारा उत्पादन खर्च सतत वाढत आहे.

यावेळी नरेश कुमार, भोला सिंह, राम कुमार, अरविंद कुमार, सतीश कुमार, घनश्याम, सुशील गौतम, यशवीर सैनी, बाबूराम, जयवीर सिंह, तैयब हसन, महबूब, तेल्लूराम, अतुल कुमार, कर्म सिंह, राजपाल, कमल पाल आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here