ऊस दर ४०० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी

सहारनपूर : सरकारने उसाचा दर त्वरीत वाढवून ४०० रुपये प्रती क्विंटल करावा अशी मागणी भारतीय किसान संघाचे प्रदेश संयोजक श्यामवीर त्यागी यांनी केली आहे. यासोबतच गेल्या वर्षीची उसाची थकबाकी व्याजासह करण्यात यावी असे ते म्हणाले.

संघाच्या बलिया खेडी विभागातील छाछरेकीमध्ये आयोजित बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात अशी मागणी केली. मेरठ विभागाचे अध्यक्ष हरवीर सिंह ठाकूर यांनी साखर कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू केले जावेत अशी मागणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस कारखान्याला पाठवून गव्हाची पेरणी वेळेत करता येईल असे ते म्हणाले.

जिल्हा अध्यक्ष राहुल त्यांनी म्हणाले, भात खरेदी केंद्रे सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान्य विक्री करण्यात अडचणी येणार नाहीत. अनिल चौधरी यांनी सरकारने वीजेचे दर कमी करण्याची मागणी केली. यावेळी डॉ. मणिकांत भारद्वाज, जितेंद्र कांबोज, मेनपाल सिंह, सुखदेव कंबोज, नवीन कंबोज, अशोक कुमार, रविंद्र प्रधान, राजपाल त्यागी, सुनील त्यागी, तस्लीम त्यागी, पप्पू कश्यप, नीरज, गौतम आदी उपस्थित होते. दरम्यान युवा शेतकरी नेते चौ. अतुल फंदपुरी यांनी ऊस, भातासह भाजीपाला पिकासाठी आवश्यक असलेली खते, युरीया गेल्या बारा दिवसांपासून उपलब्ध नसल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेण्याची मागणी त्यांनी फंदपुरी येथे आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत केली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here