ऊसदर ४५० रुपये करण्याची मागणी

89

बिलग्राम : भारतीय किसान यूनियनच्या अवध येथील कार्यकर्त्यांनी ऊस दर ४५० रुपये करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी उप जिल्हाधिकारी एस. पी. श्रीवास्तव यांच्याकडे राष्ट्रपतीच्या नावे निवेदन देण्यात आले.

भारतीय किसान युनीयनच्या कार्यवाहक प्रदेश अध्यक्ष श्यामू शुक्ला आणि प्रदेश महामंत्री मयंक सिंह चौहान यांनी सांगितले की, सरकारद्वारे जे कृषी कायदे लागू करण्यात आले आहेत, त्यातून शेतकऱ्यांची फसवणूकच होणार आहे. सरकारने तिन्ही कायदे मागे घ्यावेत अथवा त्यामधअये सुधारणा करावी. यासोबतच स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाच्या आधारावर हमीभावाबाबत कडक कायदा करायला हवा.

राज्यात ऊसाचा दर ४५० रुपये प्रति क्विंटल करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना चौदा दिवसांत उसाची बिले मिळण्याच्या कायद्याची अंमलबजावणी करायची गरज आहे अशी मागणी करण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी कृषी आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणी केली.

पदाधिकाऱ्यांनी इतर समस्याही सोडविण्याची मागणी केली. यावेळी शेतकरी नेते राहुल मिश्रा, जिल्हाध्यक्ष कादीर पहलवान, तालुकाध्यक्ष भोले सिंह, टोडरपूर अध्यक्ष अमिताभ सिंह, प्रदेश उपाध्यक्ष दिनेश वर्मा, मीडिया प्रभारी हिमांशू दीक्षित, शोभित शुक्ला, ब्रज किशोर त्रिपाठी आदी उपस्थित होते.

 

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here