बिजनौर : भारतीय किसान युनियनच्या तोमर गटाने शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आगामी २०२१-२२ या गळीत हंगामासाठी ऊसाचा दर ५०० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणीही केली.
भाकियू तोमर गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तहलीस कार्यालयावर पोहोचले. तेथे युनियनचे शीशपाल, नरेश ठाकूर, लोकेंद्र, मुकेश कुमार, राहुल त्यागी, राहुल चौहान आदींच्या नेतृत्वाखाली उप जिल्हाधिकारी कुंवर विरेंद्र प्रताप मौर्य यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, सरकारच्या धोरणांमुळे महागाई उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे. त्यामुळे सरकारने खते, डिझेल, विजेचे वाढलेले दर कमी करावेत, शेतकऱ्यांना उसाचा योग्य दर द्यावा आणि आगामी गळीत हंगामात ५०० रुपये प्रती क्विंटल ऊस दर द्यावा, साठ वर्षावरील शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये निवृत्तीवेतन द्यावे, तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत आणि दिल्लीतमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link