साखर कारखान्याकडून दोन वर्षांच्या थकबाकीची मागणी

रुडकी: शेतकरी क्लब च्या राष्ट्रीय अध्यक्षांनी इकबालपुर साखर कारखान्याकडून दोन वर्षांची ऊस थकबाकी भागवलिजाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

भारतीय किसान क्लब चे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी कटार सिंह यांनी सहायक ऊस आयुक्त यांच्याकडून जिल्हा अधिकारी यांना निवेदन पाठवले आहे. ज्यामध्ये त्यांनी क्षेत्रातील सर्व शेतकर्‍यांसाठी मागणी केली आहे की, इकबालपूर साखर कारखान्याकडून गेल्या वर्षाच्या 2017-18 तसेच 2018-19 चे जवळपास 140 करोड रुपये देय आहेत. या क्रमामध्ये कारखान्याकडे जवळपास 135 करोड रुपयांच्या रकमेचा साखरेचा स्टॉक आहे. जो कारखाना व्यवस्थापनाकडून लिखित रुपात संबंधित विभाग तसेच माननीय हायकोर्ट मध्ये देण्यात आला आहे, या साखरेला कारखान्याकडून विकून शेतकर्‍यांची थकबाकी भागवली जाण्याची अपेक्षा आहे, पण कारखाना व्यस्थापनाने साखर विकण्यामध्ये उशीर केंला आहे ज्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक दुरावस्था वाढत आहे. अशा स्थितीमध्ये शेतकर्‍यांना आंदोलन करण्यासाठी नाइलाज झाला आहे. कारण बँक वसुली तसेच विज विभागाची वसुली सातत्याने सुरु आहे, ज्यामुळे शेतकरी स्वत:ला कर्जमुक्त करु शकत नाही. आणि त्याची स्थिती दयनीय झाली आहे.आगामी काळात अशी स्थिती न व्हावी यासाठी कोणत्याही प्रकारे व्यावहारिक रुपात साखर विकून शेतकर्‍यांना पैसे दिले जाणे अत्यावश्यक आहे. त्यांनी सर्व शेतकरी तसेच भारतीय किसान क्लब यांच्याकडून आग्रह करुन सांगितले की, या ज्वलंत समस्येचे समाधान आपल्या स्तरावर त्वरीत केले जावे अन्यथा शेतकर्‍यांना आपल्याच पीकाच्या पैशासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणे आवश्यक होईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here