सोमेश्वर साखर कारखान्याने प्रति टन 300 रुपये देण्याची मागणी

पुणे : यंदा लांबलेल्या पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. उसाची लग्न, हंगाम पूर्व मशागत यासाठी शेतकऱ्यांना पशांची गरज असल्याने सोमेश्वर साखर कारखान्याने तातडीने शेतकऱ्यांना प्रति टन 300 रुपये द्यावेत अशी मागणी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

खैरे यांनी म्हटले आहे कि, पाऊस लांबल्याने शेतकरी धास्तावला आहे. शेतकरी आपल्या दररोजच्या गरजा भागवितानाही मेटाकुटीला आला आहे. अशास्थितीत साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. सोमेश्वर साखर कारखान्याने नुकत्याच संपलेल्या हंगामात साडेबारा लाख टनापेक्षा अधिक गाळप केले आहे. कारखान्याचा उताराही ११.९२ टक्के इतका आहे. ते म्हणतात, सभासदांना गरज असूनही कारखान्याकडून मदतीसाठी हालचाल झालेली नाही. किमान आता तरी कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रति टन 300 रुपये जमा करावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here