साखर आयातीवर प्रतिबंध घालण्याची मागणी

नेपाळ : नेपाळ द्वारा देशात साखरेवरील आयात प्रतिबंध हटवल्याच्या एका आठवडयानंतर व्यापाऱ्यांनी साखर आयातीवर पुन्हा प्रतिबंध घालावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. येणाऱ्या काही महिन्यांसाठी पुरेल इतकी साखर देशात आहे, त्यामुळे साखर आयात करण्याची गरज नसल्याचा दावा त्यांनी केला.

दोनच महिन्यात येणाऱ्या दसऱ्याच्या सणापर्यंत व्यापाऱ्यांनी साखर आयात थांबाावावी, अशी विनंती त्यांनी सरकारला केली. नेपाळ साखर उत्पादक संघाने साखर आयातीवरील निर्बधाच्या त्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी सरकारला पत्र लिहिले आहे.

नेपाळच्या घरगुती साखर उद्योगांनी असा दावा केला होता की, ते इतर देशातील साखरेशी स्पर्धा करु शकत नाहीत. बाजारामधील स्वस्त परदेशी साखरेने त्यांच्या तुलनेत महाग असणाऱ्या नेपाळी साखरेची मागणी कमी केली होती. मार्च २०१८ मध्ये, घरगुती साखरेच्या वृध्दीसाठी साखरेच्या आयातीवरील शुल्क १५ टक्यांवरून ३० टक्के केले होते. पण त्यानंतरही साखर कारखान्यांच्या संघर्ष सुरूच होता, यानंतर नेपाळ सरकारने घरगुती उत्पादनाला दिलासा देण्यासाठी ऑक्टोबर २०१८ मध्ये साखर आयातीवर निर्बंध घातले होते.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here