अमरोहा : हसनपूरमध्ये भारतीय किसान युनियनच्या भानू गटाची मासिक तालुकास्तरीय पंचायत नव्या मंडईत आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी सूरज सिंह होते. बैठकीचे संचालन राजू चौहान यांनी केले. यावेळी ऊस दर ४५० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी करण्यात आली. हसनपूर कारखान्याकडून गेल्या वर्षीचे थकीत २६ कोटी रुपये व्याजासह वसूल करावेत, उसाचा दर ४५० रुपये प्रती क्विंटल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यावेळी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. जनावरांच्या चाऱ्यासाठी असलेली शेकडो एकर जमीन भू माफिकांनी हडपली आहे. ती मुक्त करावी. मुख्यमंत्र्यांचा आदेश असतानाही वीज बिलांच्या थकबाकीपोटी शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. याबाबत लक्ष देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. याबाबत जिल्हास्तरीय महापंचायत आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. बैठकीस भारतीय किसान यूनियन भानुचे विभाग अध्यक्ष धीरज सिंह, अस्लम सैफी, ओमपाल सिंह, सुखीराम सिंह चौहान, प्रमोद चौहान, शोएब अख्तर, कासिम सैफी, रिहान, आले नबी, रामपाल सिंह, रोहतास, मायाराम सिंह, दिवाण सिंह आदी उपस्थित होते.