फिलीपीन्समध्ये साखर आयात करण्याची मागणी

मनीला : फिलीपीन्स च्या खाद्य पदार्थ बनवणार्‍या कंपन्या घरगुती बाजारातील साखरेच्या वाढत्या दरामुळे नाराज आहेत. शिवाय त्यांनी सरकारला इतर देशांमधून साखर आयात करण्याची मागणी केली आहे. यानंतर ट्रेड डिपार्टमेंट ने पुन्हा एकदा घरगुती पुरवठादारांना साखरेच्या कीमती कमी करुन, या देशात आयात करण्यात येणार्‍या साखरेच्या किमतींएवढ्या ठेवण्यास सांगितल्या आहेत.

व्यापार आणि उद्योग सचिव रेमन लोपेज यांनी सांगितले की, आयात केलेल्या साखरेच्या प्रमाणात स्थानीक किमती अधिक असल्यामुळे स्थानीक फूड प्रोसेसर कंपन्यांनी पुन्हा एकदा साखरेची आयात करण्याची मागणी केली आहे. फिलीपीन्स चेंबर आणि अ‍ॅग्रीकल्चर एंड फूड इंक च्या साप्ताहिक बैठकीत त्यांनी सांगितले की, एसआरए ने आयातीची अनुमती देण्यासाठी खाद्य निर्मिती कंपन्यांची मागणी मंजूर करण्याचे आश्‍वासन दिले.

फिलीपीन्स मध्ये सध्या आयात केलेल्या साखरेची किंमत 1,900 पेसो प्रति बॅग आहे, जसे की स्थानिक स्तरावर साखरेची किंमत 2,000 पेसो प्रति बॅग पेक्षाही अधिक आहे. घरगुती बाजारामध्ये स्थानिक साखरेचा एक छोटा भागच खाद्य प्रसंस्करण उद्योगासाठी वापरला जातो. लोपेज यांनी सांगितले की, एसआरए आता देशाच्या खाद्य प्रसंस्करण उद्योग ला स्थानिक साखर पुरवठादारांकडून जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here