बंद साखर कारखाना सुरू करण्याची आमदारांकडे मागणी

भिखीविड :शेरो गावात गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला साखर कारखाना पुन्हा सुरू करून निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जावी अशी मागणी जम्हूरी शेतकरी संघटनेचे नेते दलजीत सिंह दयालपुरा, गुरूसाहिब सिंह कादिया, बलजीत सिंह लक्खोवाल, अजायब सिंह राजेवाल, मुखत्यार सिंह मल्ला आदींनी केली. या शिष्टमंडळाने खेमकरण विभागाचे आमदार सरवन सिंह धुन्न यांना निवेदन देताना सांगितले की, भ्रष्टाचारासंबंधीत कारणांमुळे शेरों गावातील साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडला आहे. तो तातडीने सुरू करावा.

याबाबत जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, दलजीत सिंह दयालपुरा, रतन सिंह, रेशम सिंह, सुखदेव सिंह आदींनी आमदार धुन्न यांच्यासोबत बैठक घेतली. कोट्यवधी रुपये खर्चून १०० एकर जमिनीवर उभारलेला शेरो येथील साखर कारखान्याची मशीनरी खराब होत आहे. पाच वर्षे काँग्रेस सरकारकडे मागणी केली. मात्र, दुर्लक्ष केले गेले. सरवन सिंह धुन्न म्हणाले की, आम आदमी पक्षाच्या सरकारने निवडणुकीत विस आश्वासने दिली होती. ते पूर्ण केली जातील. बंद कारखाना सुरू करण्यासह शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी उपलब्ध करून देणे व इतर मागण्यांबाबत मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत बैठक घेतली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here