सितारगंजमध्ये इथेनॉल प्लांट सुरू करण्याची ओएनजीसीकडे मागणी

86

डेहराडून : राज्याचे सैनिक कल्याण तथा औद्योगिक विकास मंत्री गणेश जोशी यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेऊन सितारगंजमध्ये इथेनॉल प्लांट सुरू करण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्र्यांकडे त्यांनी ओएनजीसीकडून डेहराडूनमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या फेअरवेज पॉलीसीबाबतही चर्चा केली.

सोमवारी कॅबिनेट मंत्री जोशी यांनी नवी दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकार सातत्याने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करुन पेट्रोल आयात घटविण्याच्या प्रयत्नात आहे. हे पाऊल पर्यावरणाच्या दृष्टीने लाभदायक आहे. अनेक राज्यांमध्ये इथेनॉल प्लांट सुरू करण्यात आले आहेत. काही ठिकाणी उत्पादनही सुरू झाले आहे. उत्तराखंडमध्ये इथेनॉल प्लांट सुरू झाल्यास त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल. त्यांच्या उत्पादनातही भर पडेल. यातून स्थानिक साखर कारखान्यांना फायदा मिळेल. तसेच पेट्रोलियम उत्पादनांचेही दर स्थिर राहतील. केंद्र सरकार भविष्यात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातून रोजगार वाढेल.

ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांचा मुद्दा मांडताना मंत्री म्हणाले, पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरही हे धोरण निश्चित करण्यात आलेले नाही. त्याच्या पुनरिक्षणाची गरज आहे. याबाबत केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी इथेनॉल प्लांटबाबत आश्वासन दिल्याची माहिती मंत्री जोशी यांनी दिली. याशिवाय ओएनजीसीच्या कामगारांच्या फेअरवेज पॉलिसीबाबत योग्य ती पावले उचलली जातील असे ते म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here