थकीत साखर कारखान्याऐवजी इतर कारखान्यांची ऊस खरेदी केंद्रे देण्याची मागणी

शामली : शामली ऊस सहकारी संस्थेच्या ऊस संरक्षण सभेत संतप्त शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. ऊसाचे पैसे कारखान्याने थकवल्याने जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांच्या ऊस वितरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांच्या गदारोळानंतर समितीचे सचिव मुकेश राठी यांनी खरेदी केंद्रे बदलण्याचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हा ऊस अधिकाऱ्यांच्या मार्फत राज्याच्या ऊस आयुक्तांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, थकीत बिले मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. कुडाणा येथील शेतकरी जयपालसिंग मलिक उपोषणाला बसले आहेत. तर शामली ऊस सहकारी संस्थेत शुक्रवारी सकाळी टाकी रोडवरील एका विवाह मंडपात ऊस संरक्षण समितीची सभा सुरू होती. आंदोलनकर्ते शेतकरी संजीव लिलौन, जयपालसिंह कुडाणा यांसह अनेक गावातील शेतकरी समितीच्या बैठकीत पोहोचले. शेतकरी येताच सभेत गोंधळ उडाला. शामली साखर कारखान्याचे उसाचे संपूर्ण पैसे द्यावेत आणि या कारखान्याचे खरेदी केंद्र खतौली व तितावी साखर कारखान्याला देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

ऊस संरक्षण बैठकीत शामली ऊस परिषदेचे माजी अध्यक्ष राजवीर सिंग म्हणाले की, शामली साखर कारखान्याची अलीपूर, जहानपूर, मायापूर ही खरेदी केंद्रे ऊन कारखान्याला जोडण्यात यावीत, मालेंडीचे मनोज कुमार यांनी मालेंडी, ताना येथील खरेदी केंद्र जोडण्यात यावीत. अशी मागणी केली. दरम्यान, जर लवकर कर्ज प्रक्रिया पूर्ण झाली तर शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे दिले जातील, असे शामली कारखान्याचे ऊस विभागाचे सरव्यवस्थापक बलधारी सिंह यांनी सांगितले. अथवा कारखान्याच्या शेड्यूलप्रमाणे फेब्रुवारीपर्यंत पैसे देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here