म्हैसूर : कर्नाटकात ऊस दरात वाढ करण्याची मागणी केली जात आहे. कर्नाटक राज्य ऊस उत्पादक संघाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ऊस दरात सुधारणेसाठी एफआरपीमध्ये बदलाची मागणीबाबत आंदोलनासाठी गन हाऊस सर्कलजवळ कुवेम्पु पार्कमध्ये बैठक घेतली. बैठकीत बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष कुरबुर शांता कुमार यांनी सांगितले की, ते गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशात ऊस शेती आणि साखर उद्योगाची पाहणी करण्यास गेले होते. ते म्हणाले की, युपीमध्ये ऊस उत्पादकांना एफआरपी म्हणून ३५०० रुपये प्रती टन दर दिला जातो. याशिवाय तेथील सरकारने वेळेवर ऊस कारखान्यापर्यंत पोहोचावा यासाठी उपाय केले आहेत. मात्र कर्नाटमध्ये अशा सुविधांचा अभाव आहे.
कर्नाटक सरकारने शेतीच्या सिंचनासाठी वीज देण्याची गरज आहे. कमी किमतीत खते, लागणीसाठी बियाणे आणि इतर कृषी सुविधांची वेळेवर उपलब्धता करून शेतकऱ्यांना वाचविण्याचे आवाहन करण्यात आले. शांता कुमार म्हणाले की, जर सरकार या सुविधांची पूर्तता करण्यास, ऊस दरवाढ करण्यात अपयशी ठरले तर असोसिशएन एका मोठ्या आंदोलनाची घोषणा करेल. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर एफआरपी सरकारने लागू करावी. या बैठकीस असोसिएशनचे पदाधिकारी अट्टाहल्ली देवराज, किरागासूर शंकर आदी उपस्थित होते.