दोषी साखर कारखानदारांना तुरुंगात पाठवण्याची मागणी

लखनौ : ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी आपली थकबाकी मिळवण्याच्या दृष्टीने साखर कारखानदारांविरोधात तिव्र संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे, ऊस थकबाकी बाबत घेण्यात आलेली बैठक ऊस शेतकर्‍यांनी थकबाकी ताबडतोब मागितल्यामुळे हिंसक झाली. ऊस शेतकर्‍यांनी यासंदर्भातील दोषी साखर कारखानदारांना तुरुंगात पाठवण्याची मागणी केली आहे.

या बैठक़ीत पाच जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. हिंसक वातावरण शांत करण्यासाठी साखर आयुक्त संजय भूसरेड्डी यांनी कारखानदारांविरोधात कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. ऊस शेतकर्‍यांनी असा दावा केला की, त्यांची अर्थिक स्थिती दिवसेंदिवस नाजूक होत आहे. त्यांना अजूनही थकबाकी मिळालेली नाही. यामुळे शेतकरी आपला उदरनिर्वाह सहजपणे करु शकत नाहीत. मुलांची शाळेची फी देखील ते भरु शकलेले नाहीत.

उत्तर प्रदेशात ऊस थकबाकी अतिशय मंद गतीने भागवली जात आहे. यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व कारखान्यांना ऊस थकबाकी 31 ऑगस्टपर्यंत भागवण्याचे निर्देश दिले होते. तरीही, साखर कारखान्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांचे उल्लंघन करुन, अजूनपर्यंत थकबाकी भागवली नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here