आठ वर्षांपासून बंद साखर कारखाना सुरू करण्याची मागणी

सहारनपूर : आठ वर्षांपासून बंद पडलेला शाकंभरी साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बैठक घेतली. पंचायतीनंतर माजी आमदार नरेश सैनी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन पाठविण्यात आले. परिसरातील विविध गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी टोडरपूर येथील बंद पडलेल्या शाकंभरी साखर कारखान्याच्या गेटवर बैठक घेतली. यावेळी सतीश शर्मा, सुधीर कुमार, राजेश प्रधान, अनिल काम्बोज, चौधरी देवी सिंह, माजी अध्यक्ष जायर हुसैन चाँद मियाँ, दिलशाद पोसवाल, चौधरी हाशिम आदींनी सांगितले की, विभागात साखर कारखान्याच्या स्थापनेनंतर येथील शेतकरी आर्थिक दृष्ट्या मजबूत झाला होता. मात्र, कारखाना बंद पडल्यानंतर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. शेतकऱ्यांना आपला ऊस कमी दरात विक्री करावा लागतो.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, विभागातील ऊस उत्पादक शेतकरी गेल्या आठ वर्षांपासून सतत कर्जाच्या खाईत लोटले जात आहेत. आपल्या परिस्थितीबाबत शेतकऱ्यांनी माजी आमदार नरेश सैनी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले. आगामी गळीत हंगामात कारखाना सुरू केला जावा अशी मागणी केली आहे. माजी आमदार सैनी यांनी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत प्रश्न करू असे आश्वासन दिले. पंचायतीमध्ये चौधरी सितम सिंह, योगेश कुमार, पद्मप्रकाश शर्मा, नवीन चौधरी, सुधीर कर्णवाल, कर्मसिंह पवार, दर्शन लाल, श्याम सिंह, प्रदीप प्रधान, अनिल सैनी, बिरमपाल सिंह आदींसह शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here