भूना साखर कारखाना सुरु करा, शेतकर्‍यांची महापंचायतीत सरकारकडे मागणी

111

फतेहाबाद : भुना साखर कारखाना पुन्हा चालू करा या मागणीसाठी मंगळवारी शेतकर्‍यांनी महापंचायतीचे आयोजन केले होते. शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या महापंचायतीला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना नेत्यांनी सांगितले की, सरकारने हा कारखाना बंद करुन शेतकर्‍यांचा रोजगार काढून घेतला आहे. त्यामुळे हा कारखाना पुन्हा सुरु केला जावा.

तसेच ते म्हणाले कि, सरकारी आकड्यांनुसार, या परिसरात यावेळी साडे तेरा एकरात उस लागवड करण्यात आली आहे. साखर कारखाना बंद पडल्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. गेल्या 3 वर्षांपासून शेतकरी धरणे आंदोलन करुन कारखान्याला चालू करण्याची मागणी करत आहेत.

मुख्यमंत्री मनोहर लाल सह भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनी शेतकर्‍यांना कारखाना सुरु करण्यासंदर्भात आश्‍वासनही दिले आहे. पण अजूनही कारखाना सुरु करण्याबाबत कोणतेही पाउल उचलले गेले नाही. जर सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर या महापंचायतीत जो निर्णय घेतला जाईल, त्यानुसार पुढील रणनिती आखली जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here