मुजफ्फरपुर : बरुराज आणि साहेबगंज विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा मोतीपूर साखर कारखाना सुरु करण्याची मागणी केलीआहे. दोन्ही विधासनभा क्षेत्रांच्या व्हर्च्युअल मिटींग मध्ये मंगळवारी पक्ष नेत्यांनी गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्या समक्ष जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हितासाठी साखर कारखाना सुरु करण्याची मागणी केली वर्ष 2005 च्या विधानसभा निवडणूकांमध्ये ही एनडीए ने मोतीपूर साखर कारखाना हा मुद्दा अजेंड्यावर घेतला होता. सरकार स्थापन झाल्यानंतर कारखाना खाजगी कंपनीला सुपुर्द करुन सुरु करण्याची घोषणाही केली होती. खाजगी कंपनीला कारखाना देण्याविरोधात मोतीपूर साखर कारखान्याचे जुने मालक कोर्टात गेले आणि याचा निर्णय अजून आला नाही.
गृहराज्य मंत्री यांनी जिल्हा भाजपाला साखर कारखान्याशी संबंधित पूर्ण माहिती मेलवर पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनी माजी आमदार राजू सिंह यांना साहेबगंज मध्ये पीपीई कीट,होडी, अॅम्ब्युलन्स आणि स्वच्छतागृहाच्या व्यवस्थेबाबत सुचविले. राजू सिंह यांनी बंगरा घाट वर असणार्या पुलाचे नाव भाग्यनारायण राय पुल ठेवण्याची मागणी केली. अरुण कुमार सिंह यांनी बरुराज मध्ये छोट्या उपचार केंद्रांवर कोरोना टेस्ट सुरु करण्याची मागणी केली.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.