30 ऑक्टोबर पर्यंत सर्व साखर कारखाने सुरु करण्याची मागणी

अमरोहा, उत्तर प्रदेष: ऊस समिती परिसरामध्ये बुधवारी बैठक घेण्यात आली, यामध्ये 30 ऑक्टोबरपर्यंत सर्व साखर कारखाने सुरु व्हावेत आणि खरेदी केंद्रातील गडबड दूर होण्याचा मुद्दा चर्चेत आला. यावर अधिकाऱ्यांनी ही समस्या सोडवण्याबाबत विश्वास दिला.

या बैठकीत साखर कारखान्यातील अधिकारी, प्रतिनिधी, ऊस समितीतील मान्यवर, शेतकरी संघटनेने भाग घेतला. दरम्यान शेतकऱ्यांनी मागणी केली की, 30 ऑक्टोबर पर्यंत सर्व कारखाने सुरु करावेत. पावत्या लवकरात लवकर शेतकऱ्यांना उपलब्ध कराव्यात, जेणेकरुन ते आपल्या शेतात गव्हाची लागवड करु शकतील. ऊस खरेदी केंद्रावर वजन कपात थांबवली जावी. समस्यांचे निराकरण केले जावे.

दरम्यान समिती चेअरमन भगत सिंह बोबी यांनी . शेतकऱ्यांना समस्या निवारणाचे आश्वासन दिले. यावेळी समिति सचिव ज्ञानेंद्रपुरी गोस्वामी, जयवीर सिंह, मुकुलवीर सिंह, जाकिर, कुलदीप, धर्मेंद्र, अमरजीत, अजीत, बुधसिंह, अमरपाल सिंह, मनोज, उदयभान व आजाद सिंह सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here