साखर कारखान्यासमोर भाकियू कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन

सहारनपूर : उसाची थकबाकी न मिळाल्याने संतप्त झालेल्या भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दया साखर कारखान्यासमोर धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

सकाळी दहा वाजता कार्यकर्ते दया शुगर मिलच्या परिसरात पोहोचले. भारतीय किसान युनियनच्या टिकैत गटाच्या कार्यकर्त्यांनी उसाचे पैसे तातडीने देण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले. यावेळी कारखाना प्रशसानाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तालुका अध्यक्ष अनुप सिंह यांनी सांगितले की, सात जुलै रोजी शेतकऱ्यांनी थकबाकीची मागणी केली होती. त्यावेळी कारखान्याने १५ जुलैचे आश्वासन दिले. मात्र, या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आंदोलन सुरू करावे लागत आहे. सकाळपासून आंदोलन सुरू केले तरी त्याची दखल कारखाना प्रशासनाने घेतलेली नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, कार्यकर्त्यांनी जोपर्यंत बँक खात्यांमध्ये पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. आंदोलनात विक्रम सिंह, नितिन यादव, सुभाष, निर्भय फौजी, जिले सिंह, पूरन सिंह, जमशेद, दुष्यंत त्यागी, सजय त्यागी, वीरेंद्र, रमेश, अकुल, अशोक, राज सिंह, बीरम, टोनी, सतबीर सिंह आदी सहभागी झाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here