ऊस थकबाकी भागावण्यासाठी साखर कारखान्याबाहेर निदर्शने

119

फगवाड़ा, पंजाब: भारतीय किसान यूनियन दोआबा यांच्या नेतृत्व मध्ये अनिश्चितकालीन धरणे आंदोलन गेल्या रविवारी फगवाड़ा साखर कारखान्याच्या बाहेर शेतकऱ्यानी केले. गेल्या हंगामातील प्रलंबित असणारी 73 करोड थकबाकी मिळण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना शेतकरी नेते मंजीत सिंह राय, कुलवंत सिंह संधू, कृपाल सिंह मुसापुर, सतविंदर सिंह संधवान, सतनाम सिंह साहनी यांनी सांंगितले की, सातत्याने तडजोडी करूनही, शेतकऱ्यांचे 73 करोड दिलेेले नाहीत.

त्यानी सांगितले की, शेतकरी आर्थिक संकटाशी संघर्ष करत आहेत. आणि इशारा दिला आहे की, जोपर्यंत थकबाकी भागवली जाणार नाही तोपर्यंत शेतकरी साखर कारखाना पुन्हा सुरु करु देणार नाहीत.

प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा केली आणि थकबाकी लवकरात लवकर भागवण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here