कोरोना असूनही यंदाच्या हंगामात भारताने साखर निर्यातीत केले चांगले प्रदर्शन

कोरोना वायरस असूनही या हंगामात भारताने साखर निर्यातीमध्ये चांगली कामगिरी केली. साखर निर्यात मागील सर्व हंगामाच्या तुलनेत चांगली झाली आहे. आतापर्यंत सध्या 5.7 मिलियन टन साखर निर्यातीसाठी करार केले आहेत. सरकारला आशा आहे की, पुढच्या हंगामातही निर्यातीत चांगली कामगिरी राहिल.

खाद्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुबोध कुमार सिंह यांनी सांगितले आहे की, आम्ही 5.7 मिलियन टनाचे करार केले आहेत, ज्यापैकी 5.5 मिलियन टन कारखान्यांतुन यापूर्वीच पाठवण्यात आले आहेत. आम्हाला आशा आहे की, हंगाम संपण्यापूर्वी 5-6 लाख टनाचे आणखीन करार असतील. साखर कारखान्यांना या हंगामात 6 मिलियन टन साखर निर्यातीचे लक्ष्य देण्यात आले होते.

त्यांनी सांगितले की, कोरोना दरम्यान मंत्रालय, कारखानदार आणि ट्रान्सपोर्टर यांच्या दरम्यान चागल्या समन्वयामुळे विक्रमी निर्यात शक्य झाली आहे. जागतिक बाजारात निरंतर मागणीमुळे निर्यातीमध्ये गती आली आहे.

यापूर्वी सर्वात अधिक साखरेची निर्यात 2007-08 मध्ये झाली होती जेव्हा भारताने 4.9 मिलियन टनाचे उत्पादन केले होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here