जादा ऊस असूनही गळीत हंगाम लवकर संपणार

शामली: चालू हंगाम साखर कारखाने आणि शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरला आहे. साखर कारखान्यांच्या परिसरात ऊस वाढला आहे. तरीही यंदा लवकर गाळप हंगाम समाप्त होईल.

शामली साखर कारखान्याचा हंगाम मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पूर्ण होईल. गेल्यावर्षी हंगाम १२ जूनपर्यंत सुरू राहीला होता. ऊन साखर कारखानाही मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहील. तर थानाभवनचा हंगाम एप्रिल अखेरला आटोपण्याची शक्यता आहे.

यंदा थानाभवन साखर कारखाना एक नोव्हेंबर रोजी, ऊन कारखाना दोन नोव्हेंबर तर शामली कारखाना पाच नोव्हेबर रोजी सुरू झाला. शामली कारखान्यात सुरुवातीला तांत्रिक अडचणी आल्या. नंतर गाळप योग्यरित्या सुरू आहे. ऊन आणि थानाभवन कारखानेही अडचणींविना गाळप करीत आहेत. तिन्ही साखर कारखाने आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचले आहेत. नव्याने केलेल्या सर्वेक्षणात ऊस वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कारखान्यांना आणखी वेळ लागू शकतो. मात्र, अधिकाऱ्यांच्या मते गेल्यावर्षीपेक्षा २० ते २५ दिवस आधीच हंगाम पूर्ण होईल.

शेतांमध्ये १.३९ कोटी क्विंटल ऊस
आतापर्यंत सुमारे २.९८ कोटी क्विंटल ऊस गाळप झाल्यानंतरही अद्याप १.३९ कोटी क्विंटल ऊस शेतांमध्येच आहे. नव्या सर्व्हेमध्ये शामली परिसरात १५.४९, थानाभवनमध्ये ५३ लाख तर ऊन साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १५ लाख क्विंटल ऊस वाढला आहे. दरम्यान, गेल्यावर्षी शामली कारखाना १२ जूनपर्यंत सुरू होता. यावर्षी शामलीचे सहा ऊस खरेदी केंद्रे ऊन कारखान्याला हस्तांतरीत करण्यात आली. ऊन कारखान्याचे ऊस विभागाचे महाव्यवस्थापक अनिल अहलावत यांनी सांगितले की, यावर्षी १२ लाख क्विंटल अतिरिक्त गाळप करण्यात आले. दहा मेपर्यंत गाळप पूर्ण होईल. थानाभवन कारखान्याचे महा व्यवस्थापक जे. बी. तोमर यांनी सांगितले की, ३० एप्रिलअखेर गाळप पूर्ण होईल. शालमी ऊस समितीचे सचिव मुकेश राठी यांच्या म्हणण्यानुसार, शामली कारखाना गेल्यावर्षीपेक्षा २० ते २५ दिवस आधीच हंगाम पूर्ण करेल. जिल्हा ऊस अधिकारी बहादूर सिंह म्हणाले, तिन्ही कारखान्यांनी आतापर्यंत २ कोटी ९८ लाख ६५ हजार क्विंटल ऊस गाळप केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here