शेतात लागलेल्या आगीत हजारो एकर ऊस खाक

103

बिजनौर : मंडावली परिसरातील मंझाडी गावातील ऊसाच्या शेतात अचानक लागलेल्या आगीत जवळपास दोन एकर शेतातील ऊस जळून खाक झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.

मंझाडी गावातील शेतकरी मुन्नू सिंह यांना सकाळी शेतावर गेल्यानंतर आपला दोन एकरमधील ऊस जळून खाक झाल्याचे दिसले. शेतातील उसाचे एकूण किती नुकसान झाले याची माहिती मिळू कली नाही. शेताच्या अगदी लगत एक रस्ता आहे. तेथून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीने जळती सिगारेट टाकली असावी असा परिसरातील शेतकऱ्यांचा अंदाज आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही. आगीत हजारो रुपयांचे नुकसान मुन्नू सिंह यांचे झाले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here