धामपूर साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु

149

धामपुर, उत्तर प्रदेश: धामपुर साखर कारखान्याचा गाळप हंगाम गुरुवारी सुरु झाला आहे. गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी साखर कारखान्याच्या अधिकार्‍यांनी सर्वात पहिल्यांदा पोचलेल्या शेतकर्‍यांना भेटवस्तू देवून स्वागत केले. यानंतर साखर कारखान्यातील गव्हाणीमध्ये पाहुण्यांनी ऊस घालून गाळप हंगामाचा शुभारंभ केला. यावेळी धामपुर साखर कारखान्याचे यूनिट हेड एमआर खान, जीएम कुलदीप शर्मा, जीएम प्रशासन विजय कुमार गुप्ता, पोलिस अजयकुमार अग्रवाल, उपजिल्हा अधिकारी धीरेंद्र सिंह, डॉ. एनपी सिंह, रामनारायण सिंह, भारत भूषण शर्मा, हरिराज सिंह जाट, दुष्यंत राणा, देवता डिग्री कॉलेज चे व्यवस्थापक वीरेंद्र सिंह, विजय पाल सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here