धामपूर साखर कारखाना गाळपात राज्यात अव्वल

बिजनौर : बिजनौरच्या साखर कारखान्याने राज्यात आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. जिल्ह्यातील साखर कारखाना एका पाठोपाठ एक उच्चांक प्रस्थापित करीत आहे. धामपूर साखर कारखान्याने राज्यात सर्वाधिक ऊस गाळप करुन नवा इतिहास रचला. कारखान्याने २ कोटी ३७ लाख ९८ हजार क्विंटल उसाचे गाळप करून राज्यात पहिला क्रमांक पटकावला.
बिजनौरच्या साखर कारखान्यांनी आधीच जिल्ह्यात सर्वाधिक ऊस गाळप करून प्रथम क्रमांक पटकावला होता. आता राज्यातील सर्व जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये बिजनौरच्या डीएसएम ग्रुपच्या धामपूर साखर कारखान्याने सर्वाधिक ऊस गाळपाचा उच्चांक प्रस्थापित केला. धामपूर कारखान्याने २ कोटी ३७ लाख ९८ हजार क्विंटल उसाचे गाळप केले. तर स्योहारा कारखान्याने गेल्यावर्षीचा स्वतःचा उच्चांक मोडत यावेळी २ कोटी १५ लाख ५९ हजार क्विंटल उसाचे गाळप केले.
ऊस गाळपात स्योहारा कारखानाही टॉप टेन कारखान्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुझफ्फरनगर येथील खतौली, तिसऱ्या क्रमांकावर मेरठ येथील दौराला, पाचव्या क्रमांकावर पिलीभीत येथील एलएच साखर कारखाना, सहाव्या क्रमांकावर मेरठ येथील मवाना साखर कारखाना, सातव्या क्रमांकावर मेरठ मधीलच किनौरी साखर कारखाना आहे. ऊस गाळपात टॉप टेनमध्ये मेरठ येथील तीन कारखान्यांचा समावेश आहे.

स्योहारा कारखान्याने आपला गेल्यावर्षीचा उच्चांक मोडून नवे रेकॉर्ड बनवले. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांच्या म्हणण्यानुसार, गेल्यावर्षी कारखान्याने २ कोटी १४ लाख ५० हजार क्विंटल उसाचे गाळप केले. यावेळी २ कोटी १५ लाख ५९ हजार क्विंटल ऊस गाळप केले आहे. तर धामपूर साखर कारखान्याने गेल्यावर्षी २ कोटी ३१ लाख ६३ हजार क्विंटल ऊस गालप केले होते. यंदा आतापर्यंत २ कोटी ३७ लाख ९८ हजार क्विंटल उसाचे गाळप झाले आहे. कारखाना अद्याप सुरू आहे.

गाळपात धामपूर कारखाना राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. कारखान्याने जिल्ह्याचे नाव राज्यात झळकावले अशी प्रतिक्रिया बिजनौरचे जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here