धामपूर साखर कारखान्याने बनवला नवा किर्तीमान

133

धामपूर : धामपूर साखर कारखाना प्रदेशातील सर्वाधिक गाळप क्षमता असणार्‍या कारखान्यांपैकी एक आहे. साखर कारखान्याचा गाळप हंगाम 6 नोव्हेंबर 2019 ला सुरु झाला होता. जो गुरुवारी संपला. यावेळी साखर कारखान्याने सर्वाधिक दोन करोड 31 लाख क्विंटल ऊसाचे गाळप करुन मुरादाबाद मंडळामध्ये प्रथम आणि प्रदेशामध्ये दूसरे स्थान पटकावून नवा किर्तीमान मिळवला आहे.

ऊस जीएम आजाद सिंह यांनी सांगितले की, कोविड 19 मुळे विषम स्थिती असूनही 11 जून 2020 ला साखर कारखान्याने दोन करोड 31 लाख क्विंटल पेक्षा अधिक ऊस गाळप करुन मुरादाबाद मंडळामध्ये सर्वाधिक व प्रदेशामध्ये द्वितीय स्थान वर राहिले. हे गाळप धामपूर साखर कारखान्याच्या इतिहासामध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक गाळपाचे किर्तीमान आहे. साखर कारखान्याचा गाळप हंगाम 2019-20 मध्ये बी हेवी वर गाळप करुन 8 जून 2020 पर्यत 25.95 लाख क्विंटल साखर उत्पादन तसेच 13.60 लाख क्विंटल मोलॅसिस उत्पादन केले. गेल्या वर्षी साखर कारखान्याकडून दोन करोड 9 लाख 66 हजार क्विंटल ऊस गाळप करुन 22.89 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन तसेच 13.51 लाख क्विंटल मोलॅसिस उत्पादन केले होते.

सर्वाधिक गाळपाच्या विक्रमासाठी साखर कारखाना धामपूर चे उपाध्यक्ष एमआर खान यांनी कोरोना च्या पार्श्‍वभूमीवर क्षेत्रीय शेतकरी, साखर कारखाना अधिकारी, कर्मचारी तसेच ऊस विभागाचे आभार मानले आहे. अपर ऊस महाव्यवस्थापक आजाद सिंह यांनी सांगितले की, धामपूर साखर कारखान्याकडून शेतकर्‍यांमध्ये ऊस विकास योजनांना वेळेवर कार्यान्वित करुन नवीन ऊस तंत्रज्ञानाचा प्रचार केला गेला. ज्यामध्ये ट्रेंच, डिस्टेन्स प्लान्टिग करणाऱ्या शेतर्‍यांना प्रोत्साहित केले गेले. मोफत जैविक खताचे वितरण केले गेले. यावेळी मुख्य अभियंता डीएस रेड्डी, जीएम प्रोडक्शन अनिल शर्मा, जीएम प्रशासन विजय गुप्ता, ऊस विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here