धामपूर शुगर मिल्सच्या नफ्यात वाढ

54

नवी दिल्ली : देशातील अग्रेसर साखर उद्योग समुह धामपूर शुगर मिल्स लिमिटेडने २७ जुलै रोजी आपल्या जूनच्या तिमाहीत निव्वळ नफा २६ टक्के म्हणजे ३९.३० कोटी रुपयांची वाढ नोंदवली आहे.

भारतीय शेअर बाजाराच्या नियमकांकडे केलेल्या फायलिंगनुसार, एक वर्षापूर्वी समान कालावधीत समुहाचा निव्वळ नफा ३१.१३ कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण उत्पन्न वाढून ९३३.९४ कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते ५४५.०७ कोटी रुपये होते. कंपनीच्या संचालक मंडळाने गैर-कार्यकारी स्वतंत्र संचालक नंदिता चतुर्वेदी आणि कंपनीच्या पूर्णकालीन संचालक अक्षत कपूर यांच्या राजीनाम्यास मंजुरी दिली आहे. यासोबतच संचालक मंडळाने पल्लवी खंडेलवाल यांना अतिरिक्त (गैर-कार्यकारी) स्वतंत्र संचालक आणि कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत पांडे यांना कंपनीचे पूर्णकालिन संचालकाच्या रुपात नियुक्तीसही मंजूरी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here