धाराशिव : थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांकडून कारखान्याला आठ दिवसांची मुदत

धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्यात ऊस घातला होता. मात्र, शेतकऱ्यांना पाच ते सहा महिने उलटून गेल्यानंतरही पैसे मिळालेले नाहीत. जर आगामी आठ दिवसांत थकीत बिले मिळाली नाहीत, तर आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांनी दिला आहे.

याबाबतच्या निवेदनात अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे की, तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांनी थकीत बिलांच्या मागणीसाठी अनेकदा चकरा मारल्या. खरेतर कारखान्याने गाळप केल्यानंतर लगेच पैसे देणे गरजेचे होते. किमान पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना पैशांची गरज होती. मात्र कारखाना केवळ आश्वासन देत आहे. तुळजापूर तालुक्यातील आमदारांनीही या विषयाकडे दुर्लक्ष केले आहे. बिलाअभावी शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. आगामी आठ दिवसांत ऊस बिले न मिळाल्यास शेतकऱ्यांसह कारखान्यासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा जगदाळे यानी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here