आज पुन्हा स्वस्त झाले डिझेल

139

नवी दिल्ली: सरकारी तेल कंपन्यांनी आज डिझेलच्या किंमतीमध्ये पुन्हा परिवर्तन केले आहे. आज डिझेलचे दर 8 पैसे प्रति लीटर पर्यंत कमी झाले आहेत. तर पेट्रोलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. याच्या किंमतीमध्ये गेल्या सात दिवसांपासून कोणतेही परिवर्तन झालेले नाही. मंगळवारी राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 81.06 रुपयावर स्थिर झाले तर डिझेलच्या किंमती 70.63 रुपये प्रति लीटर वर आल्या आहेत. दोन दिवसांमद्ये डिझेलच्या दरात 28 ते 30 पैसे प्रति लीटर घट झाली आहे. मागणीमध्ये कमी असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट दिसून आली आहे, ज्याचा परिणाम थेट घरगुती बाजारातील इंधनावर पडला आहे.

ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात पेट्रोलच्या किंमतींमध्ये सलग गती मिळालेली दिसून आली होती. राजधानी दिल्लीमध्येच जवळपास 16 टप्प्यात पेट्रोलच्या दरात एकूण 1 रुपये 65 पैशाची वाढ करण्यात आली होती. काही वेळासाठी यामध्येही कमी आली. 21 सप्टेंबर पर्यंत यामद्ये जवळपास 1.02 प्रति लीटरची कमी झाली आहे.

दिल्ली पेट्रोल 81.06 रुपये आणि डिझेल 70.63 रुपये प्रति लीटर आहे. मुबंई पेट्रोलचे दर 87.74 रुपये आणि डिझेलचे 77.04 रुपये प्रति लिटर आहे. कालकात्यामध्ये पेट्रोल 82.59 रुपये आणि डिझेल 74.15 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नई पेट्रोल 84.14 रुपये आणि डिझेल चे दर 76.10 रुपये प्रति लीटर आहे. नोएडा पेट्रोल 81.58 रुपये आणि डिझेल 71.14 रुपये प्रति लीटर आहे. लखनऊ पेट्रोल 81.48 रुपये आणि डीज़ल 71.05 रुपये प्रति लीटर आहे. पटना पेट्रोल 73.73 रुपये आणि डिझेल 76.24 रुपये प्रति लीटर आहे. चंडीगढ़ पेट्रोल 77.99 रुपये आणि डिझेल 70.33 रुपये प्रति लीटर आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here