प्रलंबित थकबाकी बाबतची चर्चा अपयशी

138

मुजफ्फरनगर, बुढाना : ऊसाच्या थकबाकी बाबत कोतवालीमध्ये आयोजित महापंचायतीमध्ये भाकियू नेते आणि अधिकार्‍यांमध्ये झालेली चर्चा अपयशी ठरली आहे. भाकियू नेत्यांनी व्याजासहित ऊस थकबाकीची मागणी केली. भाकियूचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी सांगितले की, सरकारने त्यांना थकबाकी मिळवून द्यावी अन्यथा तुरुंगात टाकावे. पण थकबाकी मिळाल्याशिवाय शेतकरी कोतवालीतून जाणार नाहीत.

ऊसाच्या थकबाकीच्या मागणीबाबत भाकियू चे कोतवाली परिसरामद्ये आज तिसर्‍या दिवशीही बेमुदत धरणे आंदोलन सुरु राहिले. आंदोलनस्थळी थकबाकीच्या मागणीबाबात साखर कारखाना आणि प्रशासन अधिकार्‍यांची भाकियू पदाधिकार्‍यांबराबेर चालेली चर्चा अपयशी ठरली. समस्याचे समाधान न झाल्याने आंदोलन स्थळी भाकियू चे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी सांगितले की, साखर कारखाना भैसाना वर शेतकर्‍यांचे 273 करोड रुपये मुद्दल आणि 26 करोड रुपये व्याज देय आहे. त्यांनी सांगितले की, सपा सरकारमध्ये विरोधी पक्षाचे भाजपा नेता शेतकर्‍यांना 14 दिवसांमध्ये ऊस थकबाकी देण्याबाबत बोलत होते. आज ते नेते कुठे आहेत. आता भाजपा सरकार मध्ये नेते त्याच रागाला गात आहेत. ते म्हणले, सर्व सरकार शेतकर्‍यांचे शोषण करत आहेत. भाजपा सरकारमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाहनाचे चालान पहिल्यांदा शंभर किंवा दोनशे रुपयांमध्ये होत होते, आता पाच -दहा हजारमध्ये होत आहे.

जिल्हाध्यक्ष धीरज लाटियान यांनी सांगितले की, शेतकर्‍यांना व्याजासहित ऊसाची थकबाकी दिली जावी. बँक आणि विद्युत निगम शेतकर्‍यांकडून एक एक दिवसाचे व्याज वसुल करतात. तहसील अध्यक्ष अनुज बलियान यांनी सांगितले की, शेतकरी आता थकबाकी मिळाल्या शिवाय इथून जाणार नाहीत.

आंदोलनस्थळी मंडल महासचिव आरजू अहलावत, ओमपाल मलिक फुगाना, संजीव पवार, नवीन राठी, नीटू दुल्हैरा, विकास त्यागी आदींनी मनोगत व्यक्त केले. भाकियू पदाधिकार्‍यां बराबेर थकबाकी भागवण्याबाबत झालेल्या चर्चेत जिल्हा ऊस अधिकारी आर डी द्वीवेदी, सचिव बीके राय, उपजिल्हाधिकारी कुमार भूपेंद्र, साखर कारखाना भैसाना चे जीएम केन लेखपाल सिंह आणि राजकुमार तोमर आदी उपस्थित होते.

भाकियू चे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी सांगितले की, 17 ऑगस्ट पासून हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर आरंभ केले जाईल. सर्व थाना आणि कोतवालीमध्ये धरणे आंदोलन केले जाईल. थाना क्षेत्रातील शेतकरी जवळच्या ठाण्यामध्येच धरणे प्रदर्शनात भाग घेतील. जोपर्यंत शेतकर्‍यांना व्याजासहित थकबाकी मिळणार नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरुच राहिल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here